मराठवाडा

परभणी : खासदार संजय जाधव यांना ‘वाय’ सुरक्षा द्या, अन्यथा जनआंदोलन; ठाकरे गटाचा इशारा

अविनाश सुतार

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : परभणी लोकसभेचे खासदार संजय जाधव यांना अज्ञातांनी दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तरी केंद्र व राज्य सरकारने खासदार जाधव यांना तत्काळ वाय सुरक्षा द्यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

याबाबतचे निवेदन आज (दि.२८) शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया, उपजिल्हाप्रमुख ॲड. मनोज काकाणी, तालुकाप्रमुख अनिल सातपुते, शहरप्रमुख जितेश गोरे आदींसह पक्ष पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले.

या निवेदनावर माजी पं.स.सदस्य जानकीराम पवार, माऊली व्हावळे, नगरसेवक गोविंद आय्या, अंगद बंगाळ, बंडू सौंदडे, उपतालुकाप्रमुख धोंडीराम जाधव, राजाराम पवार, अरुण कतारे, युवासेना शहर प्रमुख गोविंद जाधव, उपशहर प्रमुख नागेश कोणार्डे, रजत गायकवाड, अमोल खटिंग, विभागप्रमुख पांडुरंग टाकसाळकर, दीपक पारवे, शाखाप्रमुख श्रीनिवास भुमरे, दत्ता कदम, गोविंद मोहिते, नीरज चिनके, गोविंद रॉकेले, भारत पवार, कृष्णा चोरघडे, ज्ञानेश्वर भोसले, दीपक घोगरे व शिवसैनिक – युवासैनिकांची स्वाक्षरी आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT