परभणी : तीन जिल्ह्यातील दहा मोटरसायकलीचे गुन्हे उघड

परभणी : तीन जिल्ह्यातील दहा मोटरसायकलीचे गुन्हे उघड
Published on
Updated on

परभणी, पुढारी वृत्तसेवा : परभणी, बीड, जालना या जिल्ह्यातून मोटारसायकल पळविणार्‍या तीन आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून दहा मोटारसायकली जप्त केल्या.

परभणी रेल्वेस्थानक परिसरात एक चोरटा मोटारसायकल चोरीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड, नागनाथ तुकडे, मारोती चव्हाण, व्यंकट कुसुमे यांच्यासह अन्य कर्मचार्‍यांनी रेल्वेस्थानक परिसरात सोमवारी (दि. 27) सापळा रचला. त्यावेळी आकाश सर्जेराव जाधव व विलास सर्जेराव जाधव हे (दोघे रा. नामदेव नगर, पाथरी) युवक संयशास्पदरीत्या फिरताना आढळून आले. त्या दोघांना पथकाने ताब्यात घेत विचारपूस केली तेव्हा या दोघांनी दिनेश अर्जून गायकवाड याच्यासह परभणी शहर, मानवत, सेलू, पाथरी, परतूर, आष्टी व माजलगाव येथून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. यावरुन पथकाने रामपुरीतून सेलूच्या दिनेश अर्जून गायकवाड यास ताब्यात घेतले. दरम्यान, या तीन जणांकडून पोलिसांनी दहा मोटारसायकली जप्त केल्या.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशावरून पोनि. व्हि. डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि साईनाथ पुयड, नागनाथ तुडमे, मारोती चव्हाण, व्यंकट कुसमे, अंमलदार राहुल परसाडे, सय्यद मोबीन, विलास सातपुते, बालासाहेब तुपसमिंद्र, हरीचंद्र खुपसे, दिलावर खान, सिध्देश्वर चाटे, नामदवे डुबे, प्रशांत गायकवाड, राम पौळ, मधुकर ढवळे, रफीयोददीन, निकाळजे, भोरगोर, सायबरचे पोनि करनूर, बालाजो रेडडी, गणेश कोटकर, संतोष व्यवहारे आदींनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news