लोहारा, पुढारी वृत्तसेवा : तोरंबा येथील शेतमजूर महिलेच्या खुनाच्या संशयावरून आज (दि.२९) तिघांना लोहारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तोरंबा (ता. लोहारा) शिवारात रविवारी (दि.२८) रूपाली दुणगे या महिलेचा खून झाला होता. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ललिता बिबीशन रणखांब या शेतकरी महिलेने रविवारी (दि.२८) दिंगबर यांना फोन केला. व शेतातील कामासाठी शेतमजूरीचे काम करणाऱ्या रूपाली हिला पाठवण्यास सांगितले. त्यानंतर दिंगबर यांनी आपल्या पत्नीला रणखांब यांच्या घरासमोर सोडले. त्यानंतर दुपारी घरी येणारी रुपाली घरी न आल्याने दिंगबर यांनी ललिता रणखांब हिला पत्नी कुठे आहे ? ती घरी आली नसल्याचे सांगितले. त्यावेळी ललिता घाबरलेल्या अवस्थेत दिसली. व तिने शेतातील कोट्याकडे गेल्याचे सांगितले. दिगंबर हे कोठ्याकडे गेले. त्याठिकाणी गजेंद्र रणखांब होते. त्यास विचारले असता त्यानेही रुपाली इकडे आली नसल्याचे सांगितले. त्यांनतर दिंगबर यांनी नातेवाईकांसह परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी रणखांब यांच्या शेतात रुपाली मृत अवस्थेत आढळून आली. रूपाली यांचा गळा आवळून खून झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. त्यांचा खून नेमका कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला? याचा तपास लावण्याचे लोहारा पोलिस करीत आहेत.
या घटनेची माहिती लोहारा पोलिसांना मिळताच घटनास्थळी उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, लोहारा पोलीस निरीक्षक अजित चिंतले, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लोहारा ग्रामीण रुग्णालयात पाठवून देण्यात आला. याप्रकरणी दिगंबर शामराव दुणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतमालक गजेंद्र गोविंद रणखांब (वय ५०), ललिता बिभीषण रणखांब (वय २९), बिभीषण बालाजी रणखांब (वय ३८) यांच्याविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास उमरगा उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते हे करीत आहेत.
हेही वाचा :