Dhule Bribe News : शिंदखेडाच्या लाचखोर मुख्याध्यापकासह अधीक्षकाला बेड्या | पुढारी

Dhule Bribe News : शिंदखेडाच्या लाचखोर मुख्याध्यापकासह अधीक्षकाला बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा- खाद्यपदार्थ पुरवठयाचे बिल बचत गटास अदा करण्याकारीता मदत केल्याच्या मोबदल्यात बारा हजाराची लाच स्वीकारणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील मळसर येथील शासकीय प्राथमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुमार राठोड आणि अधीक्षक हनुक भादले यांना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने रंगेहात पकडले आहे.

तक्रारदार यांची पत्नी ही शिंदखेडा येथील पंचायत समिती येथे नोंदणी झालेल्या “सखी स्वयं सहायता समुह” या महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकिय प्राथमिक आश्रमशाळा, म्हळसर, कॅम्प सुलवाडे, ता. शिंदखेडा जि. धुळे येथे शालेय पोषण आहाराच्या निविदेमधून गरजेप्रमाणे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचे काम घेतले असून सदरच्या कामात तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करीत असतात.

सदर बचत गटाने म्हळसर शासकिय प्राथमिक आश्रमशाळा येथे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठ्याचे मागील ०९ महिन्याचे बिल २ लाख रु बचत गटाच्या बँक खात्यात जमा झाले होते. सदर बिल अदा करण्याकरीता मुख्याध्यापक प्रदिपकुमार राठोड यांनी २६,०००/-रु याआधी तकारदार यांचे कडुन घेतले होते.

त्यानंतर (दि.२५) जानेवारी रोजी मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे बचत गटाचे ०९ महिन्याचे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठयाचे बिल बचत गटास अदा करण्याकारीता मदत केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणुन २०,०००/- रु लाचेची मागणी केली. सदर रक्कम दिली तरच पुढील ०२ महिन्याचे बिल अदा करण्यास मदत करेल असे सांगीतल्याने तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात दुरध्वनीवर माहिती दिली होती. सदर माहितीवरुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांच्या उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने शिंदखेडा येथे जावून तक्रारदार यांची तक्रार घेतली होती. सदर तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांचेकडे २०,०००/- रु लाचेची मागणी करुन तडजोडीअंती १२,०००/- रुपये स्विकारण्याचे मान्य करुन अधीक्षक भादले यांनी सदर लाचेची रक्कम देण्याकरीता तकारदार यांना प्रोत्साहीत केले होते. आज त्यांचेवर सापळा लावला असता अधीक्षक हनुक भादले यांनी तकारदार यांचेकडुन १२,०००/-रु ची लाच स्विकारल्याने दोघांना पकडण्यात आले असून त्यांचे विरुध्द शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button