छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar : आंदोलनात नुकसानीच्या भीतीने बससेवा बंद, पैठण आगाराचा निर्णय

अविनाश सुतार


पैठण: मराठा आरक्षण मुद्द्यावरून ठीक ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसला लक्ष्य करण्यात येत आहे. आंदोलनकर्त्यांकडून बसेसवर दगडफेक व जाळपोळ होत असून मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात येत आहे. परिणामी आज (दि.२९) दुपारपासून पैठण आगारातून बस सेवा बंद करण्याचा निर्णय आगारप्रमुख गजानन मडके यांनी घेतला आहे.

मराठा आरक्षण मिळावे, यासाठी राज्यामध्ये ठिकठिकाणी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक स्वरूप मिळू लागले आहे. आंदोलनकर्त्यांकडून एसटी बसेसला लक्ष्य करून बस जाळणे, तोडफोड करणे यासह बसवर लावण्यात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षाच्या पुढार्‍यांच्या फोटोला काळे फासण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

राज्य परिवहन महामंडळ व पोलीस प्रशासनाच्या बैठकीत मराठा आंदोलन पार्श्वभूमीवर तातडीने बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पैठण आगारातील साठहून अधिक बस बंद ठेवण्यात आल्या आहेत. या गैरसोयीबद्दल प्रवासी वर्गांतून संताप व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT