छ.संभाजीनगर : पैठण खुले कारागृहातून फरार झालेल्या कैद्याला सांगलीतून अटक

छ.संभाजीनगर : पैठण खुले कारागृहातून फरार झालेल्या कैद्याला सांगलीतून अटक
Published on
Updated on

पैठण, पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील खुले कारागृहातून फरार झालेल्या बंदीला सांगली जिल्ह्यातून पैठण पोलिसांच्या पथकाने शोधून काढले आहे. इस्लामपूर जिल्हा सांगली सत्र न्यायालयाने रामचंद्र रघुनाथ पाटील (वय ४४ रा. पाडळेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) या आरोपीला जन्मठेप शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला दि. २४ नोव्हेंबर २०१८ रोजी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहामधून पैठण येथील खुले कारागृहात हलविण्यात आले होते. परंतु, दि.१ मार्च २०२३ रोजी दुपारी इतर बंदीसोबत शेतीचे काम करताना त्याने पलायन केले होते.

या संदर्भात खुले कारागृह अधीक्षक धनसिंग कवाळे यांच्या सुचनेनुसार पोलीस कर्मचारी सचिन भगवान पवार यांनी तक्रार दाखल केली होती. पैठण पोलीस ठाण्यात फरार बंदी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बंदीचा शोध घेण्यासाठी उपविभागीय पोलीस डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाची नेमणूक करण्यात आली होती. पोलीस पथकाने फरार झालेल्या बंदीला सांगली जिल्ह्यातून शोधून अटक करण्यात यश मिळवले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news