छत्रपती संभाजीनगर

Dhangar reservation : छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्गावर धनगर आरक्षणासाठी चक्का जाम

अविनाश सुतार

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षणासाठी मंगळवारी शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी तहसीलदार यांना विविध मांगण्याचे निवेदन देण्यात आले. आंदोलकांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात धनगर समाज बांधव उपस्थित होते. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. Dhangar reservation

मागील आठ दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून दखल न घेतल्याने या उपोषण आंदोलनाचे पडसाद आता तालुक्यामध्ये गावोगावी उमटू लागले आहेत. शासनाकडून या आंदोलनाची दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा येईल, असा इशारा धनगर समाजाकडून देण्यात आला. तसेच घटनेमध्ये असलेल्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. Dhangar reservation

यावेळी प्रभत जरारे, नगरसेवक सुनील दुधे, नागराध्यक्ष पांडुरंग दुधे, जय मल्हार सेना जिल्हा चिटणीस श्रावण मामा हासे यांनी मनोगत व्यक्त करुन शासना विरोधात संताप व्यक्त केला.

यावेळी दिगंबर गोरे, सदाशिव फुले, सरपंच निवृत्ती वरपे, अॅड. प्रमोद राऊत, काशिनाथ फुले, प्रभाकर पांढरे, कारभारी गुंजाळ, मधू हासे, सोमीनाथ गोरे, गजानन भावले, स्वप्नील गुंजाळ, राजू राऊत, हरी दुधे, सरपंच नानाभाऊ पांढरे, तुळशीराम सागरे, रामदास दुधे, बाजीराव दुधे, सोमीनाथ गोरे, राजू राऊत, भाऊलाल सुरे, समाधान फुले, डॉ. सूर्यवंशी, कचरू वाणी सरपंच, प्रल्हाद भावले, गजानन भावले, डॉ. वरपे, दिलीप जरारे, परभत जरारे, जनार्दन जरारे, टेकचंद, दुधे, अर्जुन संधर, धनसिंग दुधे, ईश्वर दुधे, विलास सपकाळ राजू गुंजाळ, रंगनाथ राऊत, एकनाथ राऊत, गजानन निवडे, रवी पांढरे आदीसह समाजबंधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सिल्लोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निक्षक चातुरे, पोलीस उपनिरीक्षक आपसाहेब झिंझुर्डे, पोलीस पंडित फुले, रामानंद बुधवत, तळेकर, परमेशवर शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT