छत्रपती संभाजीनगर : आज पासून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : आज पासून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु

पैठण पुढारी वृत्तसेवा :– पैठण येथील नाथसागर धरणात आज रविवार दि.२६ रोजी सकाळपासून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात व नदी काठावरील नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने प्रशासनाने केली आहे. रविवारी रोजी सकाळी गंगापुर, कडवा, मुकणे जलाशयातून जायकवाडी नाथसागर धरणासाठी प्रथम ५०० क्यूसेक्सने विसर्ग सुरु करण्यात येणार असून विसर्ग टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. तरी नदीकाठच्या नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

गोदावरी नदीपात्रातील चीज वस्तू ,साहित्य, मोटारी, वाहने इत्यादी पात्राचे बाहेर काढून घ्यावे यासह नदीप्रवाहात कुणीही प्रवेश करु नये. नदीपात्रा जवळील धार्मिक स्थळी तसेच पर्यटन स्थळी नागरिकांनी गर्दी करू नये. असे आवाहन नाशिक जलसंपदा विभागासह पाणी नियंत्रण समिती प्रमुख पैठण पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण शाखा उपअभियंता विजय काकडे यांनी केले आहे. सध्या पैठण नाथसागर धरणाची पाणी पातळी १५०८.५५ असून ३९.०४ टक्केवारी आहे. मागील वर्षी या तारखेला येथील नाथसागर धरणाच्या पाण्याची टक्केवारी ९९.३९ अशी होती. रब्बी हंगामासाठी नाथसागर धरणातून डावा २१०० व उजवा १००० कालव्याद्वारे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button