मराठवाडा

बीड: अंबाजोगाई बसस्थानकात चोऱ्या करणाऱ्या दोन महिला जेरबंद

अविनाश सुतार

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा: अंबाजोगाई बसस्थानकात चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात अखेर शहर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन महिलांसह ३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद घोळवे यांनी आज (दि. ५) पत्रकार परिषदेत दिली.

घोळवे यांनी सांगितले की, अंबाजोगाई बसस्थानकात लग्न सराईच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे, पर्समधील पैसे चोरत होते. याबाबतचे अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरट्यांना जेरबंद केले.

मिराबाई दत्तात्रय काळे (वय ४०, रा. जायकवाडी, सोनपठे, जि. परभणी), पूजा उदयराज भोसले (वय २१, रा. पोंडुळ, ता. सोनपेठ, जि. परभणी) रविंद्र प्रकाश ऊंडानशिव (वय ४४, रा. गंगाखेड, जि. परभणी) यांना अटक केली. त्यांच्याकडून ४ गुन्हयातील ३ लाख ३९ हजारांचे ६ तोळे सोने, रोख रक्कम ५२ हजार रुपये असा एकूण ३ लाख ९१ हजार रुपयांचा माल जप्त केला. ही कामगिरी अंबाजोगाई शहर पोलीस निरीक्षक विनोद घोळवे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT