बीड : सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालयात थुंकल्यावर होईल कारवाई ! | पुढारी

बीड : सार्वजनिक ठिकाणी, सरकारी कार्यालयात थुंकल्यावर होईल कारवाई !

गौतम बचुटे/केज :- पान, तंबाखू आणि गुटखा खाणारे यांना जिथे जागा दिसेल तिथे थुंकण्याची सवय असते. अशा सार्वजनिक जागी थुंकल्यामुळे संसर्गजन्य आजार पसरतात. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा या सारखे पदार्थ खाऊन थुंकण्यास बंदी असतानाही सरकारी कार्यालयाच्या भिंती आणि खिडक्या रंगलेल्या दिसतात. अशा थुंकण्यावर कोणी कारवाई करीत नाहीत. मात्र केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात झाडावर थुंकणाऱ्या अज्ञात इसमा गुन्हा दाखल केला आहे.

या बाबतची माहिती अशी की, पोलीस हवालदार सुधाकर जालिंदर दौंड हे कर्तव्यावर असताना पोलीस ठाणे परिसराची पहाणी करीत असताना पोलीस ठाण्याच्या मुख्य गेट समोरील अशोक वृक्षाच्या झाडाच्या बुडा जवळ व बुडावर तसेच नालीवर कोणी तरी अज्ञान इसम थुंकलेले दिसले. झाडावर कोण थुंकले या बाबत कोणी पाहिलेले नाही. परंतु अशा सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी कार्यालयात येणाऱ्या अनोळखी व्यक्तीने पोलीस स्टेशन केज येथील आमलदार व अधिकारी व इतर लोकांच्या आरोग्यास आपायकारक होइल; असे पोलीस स्टेशनच्या गेट समोरील अशोकाच्या वृक्षावर पान तंबाखु व गुटखा खावुन झाडावर व जमिनीवर थुंकून पोलीस स्टेशन केजच्या आवारातील वातावरण दूषित केले.

याची माहिती पोलीस हवालदार दौंड यांनी प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना दिली. त्यांच्या आदेशाने पोलीस हवालदार दौंड यांच्या फिर्यादी वरून अनोळखी व अज्ञात व्यक्ती विरुद्ध गु. र. नं. ३२२/२०२३ भा. दं. वि. २७८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करीत आहेत.

हेही वाचंलत का?

Back to top button