मराठवाडा

बीड : भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अविनाश सुतार

गेवराई : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील शेकटाहून दुचाकीवरून शहागड येथे वर्षश्राध्दाच्या कार्यक्रमाला जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या कारने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील विष्णू दामोदर शेंबडे (वय ५१ रा. शेकटा ) ठार झाले. हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील आगरनादुंर फाटा येथे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी, विष्णू शेंबडे शनिवार दुपारी दुचाकीवरून ( एम.एच. १२ जे. इ ७०४३) शहागड येथील पाहुण्याच्या वर्षश्राध्दाला जात होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग ५१ वरील आगरनादुंर फाटा येथे पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारने (एम.एच बी.सी १५८५) दुचाकीला जोराची धडक दिली. यात विष्णु शेंबडे हे जागीच ठार झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक सून असा परिवार आहे.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT