पिंपरी : तिसर्‍या मजल्यावरून कोसळून मजूर महिलेचा मृत्यू

पिंपरी : तिसर्‍या मजल्यावरून कोसळून मजूर महिलेचा मृत्यू
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बांधकाम साइटवर काम करीत असताना तिसर्‍या मजल्यावरून कोसळून मजूर महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 22 मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास दापोडी येथे सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर घडली.

जयश्री प्रकाश तलवारे (45) असे मृत्यू झालेल्या मजूर महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शंकर प्रकाश चलवारे (26, रा. महात्मा फुलेनगर, दापोडी) यांनी गुरुवारी (दि. 7) भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जुबेर गाझी (रा. सुंदरबाग, दापोडी), फजल खान (रा. दापोडी) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची आई जयश्री आरोपींच्या बांधकाम साईटवर मजुरी काम करीत होत्या. दरम्यान, 22 मार्च रोजी इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर काम करीत असताना जयश्री यांचा अचानक तोल गेल्याने खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.

आरोपींनी कामगारांच्या सुरक्षितेसाठी उपाययोजना केल्या नाहीत. तसेच, इमारतीवरून पडून कामगारांचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना देखील इमारतीच्या बाहेरून जाळी बसवली नाही.

कामगारांना आवश्यक ती सुरक्षेची साधने पुरवली नसल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक लांडगे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news