अंबाजोगाई (बीड); पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई नगर परिषदेच्या (Ambajogai Municipal Council) होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण आज (दि.१३) जाहीर करण्यात आले. यंदाच्या निवडणुकीत अंबाजोगाईत एकूण १५ प्रभाग असून त्यातून ३१ सदस्य निवडून दिले जाणार आहेत.
नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सभागृहात उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी हे आरक्षण जाहीर केले.
(Ambajogai Municipal Council) यंदाच्या निवडणुकीत अंबाजोगाईत एकूण १५ प्रभाग असून त्यातून ३१ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. या ३१ सदस्यात १६ महिला आणि १५ पुरुष असतील. प्रभाग १ ते प्रभाग १४ पर्यंत प्रत्येक प्रभागात एक महिला आणि एक पुरुष तर प्रभाग १५ मध्ये दोन महिला आणि एक पुरुष सदस्य असतील. अनुसुचीत जातीसाठी ५ जागा आरक्षित असून त्यापैकी ३ महिला असणार आहेत.
प्रभाग १ –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग २ –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग ३ –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग ४ –
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग ५ –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग ६ –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग ७ –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग ८ –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग ९ –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग १० –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग ११ –
अ. अनुसूचित जाती
ब. महिला
प्रभाग १२ –
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. सर्वसाधारण
प्रभाग १३ –
अ. अनुसूचित जाती
ब. सर्वसाधारण
प्रभाग १४ –
अ. महिला
ब. सर्वसाधारण
प्रभाग १५ –
अ. अनुसूचित जाती (महिला)
ब. महिला
क. सर्वसाधारण
हेही वाचलंत का ?