मोजणीसाठी पालिका खरेदी करणार जीआयएस सॉफ्टवेअर; नगररचना विभागाच्या निविदेला आयुक्तांची मान्यता | पुढारी

मोजणीसाठी पालिका खरेदी करणार जीआयएस सॉफ्टवेअर; नगररचना विभागाच्या निविदेला आयुक्तांची मान्यता

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रातील तसेच, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे भूखंडाची मोजणी करण्यात येणार आहे. जीआयएस सॉफ्टवेअरचा वापर करून अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे ही मोजणी केली जाणार आहे.
पालिका व प्राधिकरण हद्दीत असलेल्या सर्व जमिनीची मोजणी नगररचना विभाग करणार आहे. त्यासाठी जीआयएस तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्याकरीता 24 लाख 97 हजार 476 दराची निविदा राबविण्यात आली होती.

एसआयएसआय इन्फोटेक प्रा. लि.ची 23 लाख 88 हजार 894 दराची लघुत्तम निविदा पात्र ठरली आहे. त्याअंतर्गत जीआयएसचे एकूण सहा सॉफ्टवेअर खरेदी केले जाणार आहेत. तसेच, 6 संगणक संच खरेदीसाठी 5 लाख 84 हजार 910 रूपये खर्च आहे. त्यासाठीच्या खर्चास आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

Back to top button