मराठवाडा

बीड : वीज पडून दाम्पत्य जखमी

अविनाश सुतार

केज: पुढारी वृत्तसेवा : शेतातील मंदिरावर वीज पडून काम करीत असलेले पती-पत्नी जखमी झाले. ही घटना आज (दि.९) दुपारी ३.३० च्या सुमारास केज तालुक्यातील कोरेगाव येथे घडली. बळीराम गोवर्धन तांदळे (वय ३५) अनिता बळीराम तांदळे अशी जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

बळीराम तांदळे शेरी नावाने ओळखले जाणाऱ्या शेतात सोयाबीनची काढणी करीत होती. यावेळी अचानक विजेच्या गडगडटासह पाऊस सुरू झाला. त्यामुळे जवळ असलेल्या रानुबा मंदिरात निवाऱ्यासाठी गेले. त्याचवेळी रानोबाच्या मंदिरावर वीज पडली. त्यात बळीराम आणि त्यांची पत्नी अनिता हे दोघे जखमी झाले. त्यांना बेशुद्धावस्थेत केज येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले आहे. दरम्यान, या नैसर्गिक अपघाताची माहिती सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, नायब तहसीलदार लक्ष्मण धस आणि बीट जमादार दिलीप गित्ते यांना दिली.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT