Indian employees: भारतातील नोकरदारांना 'या' कारणांमुळे वाटते अपराधीपणाची भावना | पुढारी

Indian employees: भारतातील नोकरदारांना 'या' कारणांमुळे वाटते अपराधीपणाची भावना

पुढारी ऑनलाईन: मागील अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की, भारताला ‘गिल्ट व्हेकेशन सिंड्रोम’ सारख्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. अशाच प्रकारच्या एका अभ्यासातून आता पुन्हा एकदा नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये भारतीय नोकरदारांना कामावरून सुट्टी घेतल्याने (Indian employees) अपराधीपणाची भावना निर्माण होत असल्याचे या अभ्यासात नमूद करण्‍यात आले आहे.

‘रँडस्टॅड इंडिया’ या संस्थेने भारतातील ३५ ते ४० टक्के नोकरदार्‍यांच्‍या मानसिकतेचे सर्वेक्षण केले. यामध्‍ये स्‍पष्‍ट झाले की, नाेकरदारांनात्यांच्या बॉसकडून सुट्ट्या मागण्यास चिंता वाटते. तसेच सलग सुटीघेतल्या‍नंतरही मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. अमेरिकेतही असेच सर्वेक्षण करण्यात आले तेव्हा असे लक्षात आले की, सुमारे ३९ टक्के नोकरदारांनी ज्या दिवशी सुट्टी घेतली तेव्हा त्याना (Indian employees) तणावग्रस्त आणि अपराधीपणाची भावना वाटली.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सुट्ट्या आणि विश्रांती घेतल्याने मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सुट्या घेतल्यानंतर जर अपराधीपणाची भावना निर्माण व्हायची नसेल तर स्वत:च्या स्वाभिमानावर कार्य केले पाहिजे. म्हणजेच स्वत:मधील धैर्य वाढविणे हाच या समस्येवर एकमेव मार्ग असल्याचे तज्‍ज्ञांनी म्हटलं आहे. तुम्ही तुमचे काम चांगल्या पद्धतीने करत असल्याने तुम्ही तुमच्या कामापासून काही दिवस दूर राहण्यास पात्र आहात हे समजून घेतले पाहिजे.

एक्सपीडिया या ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टलने प्रसिद्ध केलेल्या २०१८ च्या अहवालानुसार ७५ टक्के भारतीयांना आपण सुट्ट्यांपासून वंचित राहत असल्याचे वाटते. अशी भावना निर्माण होणाऱ्यांमध्ये भारत हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर दक्षिण कोरिया आणि हाँगकाँग या देशांचा क्रमांक लागतो. १९ देशांच्या या वार्षिक अहवालातून असे स्पष्टपणे समजते की, सुट्ट्यांपासून वंचित रहाण्याचे म्हणजेच सुट्टी न घेण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे.

सुट्टी घेताना अपराधीपणाची भावना टाळा या टिप्स फॉलो करा

  • आधीच तुमच्या सुट्ट्यांचे नियोजन करा आणि त्या बॉसकडून ईमेलद्वारे मंजूर करून घ्या, या सुट्ट्यांचा बॅकअप तुमच्याकडे ठेवा.
  • तुमच्या अनुपस्थितीत तुमचे काम करू शकणारी किमान एखादी, दुसरी व्यक्ती आहे याची खात्री करा.
  • सुट्टीपूर्वी तुमच्या अनुपस्थितीत करावयाच्या कामाची लिस्ट करा. ती तुमच्या सहकार्याला हँडओव्हर करा.

Back to top button