मराठवाडा

बीड : उसाच्या ट्रॉलीला धडकून तरुणाचा जागीच मृत्यू

backup backup

केज, पुढारी वृत्तसेवा : केज बीड महामार्गावर मस्साजोग येथील पेट्रोल पंपाजवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि मोटार सायकलच्या अपघातात मोटारसायकल स्वारचा जागीच मृत्यू झाला. केज तालुक्यातील पिसेगाव येथील आकाश राजाभाऊ नेहरकर हा तरुण रविवारी रात्री दुचाकीवरून मांजरसुंब्याकडून केजकडे येत होता. या रस्त्यावर मस्साजोग जवळील देशमुख पेट्रोल पंपासमोर त्याची दुचाकी आली होती. त्याच्या समोर ऊस भरलेले ट्रॅक्टर हे गंगा माऊली साखर कारखान्याकडे चाललेले होते. याच वेळी दुचाकीची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक बसल्याने दुचाकीस्वार आकाश नेहरकर या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक महादेव बहिरवाल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT