Sanju Samson Ind vs Nz : संजू सॅमसनला का खेळवलं नाही? कर्णधार शिखर धवनने केला खुलासा | पुढारी

Sanju Samson Ind vs Nz : संजू सॅमसनला का खेळवलं नाही? कर्णधार शिखर धवनने केला खुलासा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील दुसर्‍या सामन्‍यात संजू सॅमसन याला संधी देण्‍यात आली नाही. यामुळे त्‍याच्‍या चाहत्‍याकडून सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून तीव्र प्रतिक्रिया व्‍यक्‍त होत आहे. यावर टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन याने खुलासा केला आहे.

भारत-न्यूझीलंड वनडे मालिकेतील आज होणारा दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हॅमिल्टनच्या सिडॉन पार्कवर हा सामना खेळवला जात होता . न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिला फलंदाजी करताना भारताने 4.5 षटकांपर्यंत 22 धावा केल्या असताना पावसाला सुरुवात झाली. अखेर 3 तास 47 मिनिटांनंतर खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा हा सामना 29-29 षटकांचा करण्यात आला होता. सामन्याला पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर 8 षटकांचा खेळ झाला. तेव्हा पुन्हा पाऊस सुरू झाला. यानंतर सामना होऊ शकला नाही आणि तो रद्द करण्यात येत असल्याची घोषणा पंचांनी केली.

Sanju Samson Ind vs Nz : संजूऐवजी दीपक हुड्‍डाला दिली संधी

या सामन्‍यानंतर बोलताना कर्णधार शिखर धवन म्‍हणाला की, पावसावर आमचे नियंत्रण असत नाही. अशावेळी आम्‍ही केवळ वाटू पाहू शकतो. आता पुढील तिसर्‍या सामन्‍यावर आमची नजर आहे. संजू सॅमसन याला आजच्‍या सामन्‍यात का खेळवले गेले नाही, या प्रश्‍नावर बोलताना शिखर धवन म्‍हणाला, आजच्‍या सामन्‍यात आम्‍ही दोन बदल केले. शार्दूल ठाकूरच्‍या जागी दीपक चहर याला तर संजू सॅमसनच्‍या जागी दीपक हुड्‍डा याला संधी दिली.

वरिष्‍ठ खेळाडूंशिवायही संघ मजबूत

न्‍यूझीलंड विरुद्‍धच्‍या दौर्‍यात विराट कोहली आणि रोहित शर्मा हे संघात नाही. यावर धवन यांनी म्‍हटलं की, “वरिष्‍ठ खेळाडूंशिवायही संघ मजबूत आहे. युवा खेळाडूंचे नेतृत्त्‍व करणे हे खूपच उत्‍साहवर्धक आहे. यामुळे मला स्‍वत:ला तरुण असल्‍यासारखं वाटतंय. शुभमन गिल याने फलंदाजीत तर उमरान मलिक यांनी गोलंदाजीत खूपच बदल केलेला आहे. तिसर्‍या सामन्‍यात आम्‍हाला चांगली कामगिरी करावी लागेल.”

हेही वाचा : 

 

 

Back to top button