मराठवाडा

माजलगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसलेंविरोधात अटक वारंट जारी

backup backup

माजलगाव, पुढारी ऑनलाईन : माजलगाव येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याविरोधात सेवानिवृत कर्मचारी मनोहर कंबळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सतत गैरहजर राहिल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंड पिठाने अटक वारंट बजावल्याने मुख्याधिकारी विशाल भोसलेंना चांगलीच चपराक बसली आहे.

माजलगाव नगरपालिकेतील सेवानिवृत कर्मचारी मनोहर कांबळे यांची पालिकेतील रक्कम सतत पालिकेकडे मागणी करुन सुध्दा मिळत नव्हती. शेवटी व्यथित होऊन त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली. याचिकेच्या सुनावनीस मुख्याधिकारी विशाल भोसले सतत गैरहाजर राहिल्याने न्यायमुर्ती रविंद्र घुगे व न्यायमुर्ती एस. जी. मेहरे यांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या विरोधात वारंट काढले आहे. सदर वारंट हे जामिनपात्र असून पोलिसांनी त्यांना पकडून २५ हजाराच्या जामिनावर सोडावे आणि ४ एप्रिल रोजी न्यायालयासमोर हजर करण्याचे वारंट काढण्यात आले आहे.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT