कोल्हापूर : बिद्री कारखान्याजवळ क्रेनने धडक दिल्याने एक जागीच ठार | पुढारी

कोल्हापूर : बिद्री कारखान्याजवळ क्रेनने धडक दिल्याने एक जागीच ठार

बिद्री : पुढारी वृत्तसेवा : बिद्री (ता. कागल) साखर कारखान्याजवळ ओढ्यावर क्रेनने मोपेडला धडक जोरदार दिली. यामध्ये मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. लक्ष्मण पांडूरंग कांबळे (वय ४८) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या बाबतची फिर्याद मयत लक्ष्मण कांबळे यांची मुलगी आश्विनी कांबळे हिने मुरगूड पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी की लक्ष्मण कांबळे हे स्कुटी मोपेडवरून (एमएच – ०९ बीएल ९५९१) गावातून बिद्री साखर कारखान्याकडे चालले होते. बिद्री गावाजवळ ओढ्यावरील रस्त्यावर पाठीमागून आलेल्या इंडो पॉवर क्रेनने मोपेडला धडक दिली. या धडकेनंतर क्रेनने मोपेडसह फरफटत नेले. लक्ष्मण कांबळे हे क्रेनच्या पाठीमागील चाकात सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मोपेडचे ही नुकसान झाले आहे.

अपघातातील क्रेन वाळवे खुर्द (ता. कागल) येथील असून राजेंद्र विष्णू शिपेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण कांबळे यांच्या कुटुंबिय व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नातेवाईंकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. कांबळे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. मुरगूड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Back to top button