मराठवाडा

बीड : अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

अविनाश सुतार

केज; पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यात एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातील एका नराधमाने अतिप्रसंग करून जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून नराधमाविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील पिसेगाव येथील एक अल्पवयीन मुलगी बुधवारी रात्री ९:३० च्या दरम्यान घरासमोरील रस्त्यावर बसली होती. त्यावेळी धनराज नेहरकर याने त्या मुलीला अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे ती घरी निघून जात असताना नराधम धनराज याने तिचे केस धरून खाली पाडले. त्यानंतर त्या मुलीने त्यास ढकलून दिले असता त्याने तिच्यावर अतिप्रसंग करून तिला व तिच्यासह वडिलांना जिवे मारून टाकण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पीडित मुलगी व तिची आई यांनी केज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी धनराज नेहरकर याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायदा आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३(१), अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. धनराजला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

SCROLL FOR NEXT