मराठवाडा

परभणी : निलज येथे पूर्णा नदीपात्रात बुडून परभणीच्या तरुणाचा मृत्यू

backup backup

परभणी, पुढारी वृत्तसेवा :  जिंतूर तालुक्यातील निलज जवळून वाहणाऱ्या पूर्णा नदी पात्रात बुडून परभणीच्या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि 31) सायंकाळी घडली. सचिन प्रभाकर पाहुकर असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. निलज या गावी कंदूरच्या कार्यक्रमासाठी हा तरूण गेला होता. हा तरूण  पूर्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेला का? किंवा नदी पात्रात उतरला? हे अधिकृतपणे समजले नाही.

या विषयी सविस्तर वृत्त असे की, जिंतूर तालुक्यातून पूर्णा नदी वाहते. गत वर्षी याच नदीवर असलेले येलदरी धरण पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने तुडुंब भरले होते. त्यामुळे उन्हाळा संपत आलेला असला तरी नदी पात्रात पाणी जास्त आहे. याच नदी लगत असलेल्या निलज या गावी कंदोरीचा कार्यक्रम असल्याने परभणीच्या साखला प्लॉट येथील रहिवाशी सचिन प्रभाकर पाहुकर (वय २६) हा आलेला होता. हाच कंदोरीचा कार्यक्रम त्याच्या जीवावर बेतला.

ही घटना माहिती होताच ग्रामस्थांनी रात्रभर शोध मोहीम राबवून सुद्धा त्याचे प्रेत सापडले नव्हते. त्यास शोधण्यासाठी महसुल प्रशासनाकडून तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी वरून एनडीआरएफच्या बचाव पथकास पाचारण करण्यात आलेले होते. पण बुधवारी (दि.१) सकाळी  सकाळी १० वाजता ग्रामस्थांना त्याचे प्रेत सापडल्याची माहिती सावळी सजाचे तलाठी अनिल राठोड यांनी दिली. निलज येथे कंदोरीच्या कार्यक्रमास आलेल्या तरुणाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT