कोल्हापूर

कोल्हापूर : सामाजिक जाणिवेतून अंध बांधवांची आरोग्य तपासणी

निलेश पोतदार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा    अंध बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. या घटकाच्या मूलभूत गरजांसह आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी समाजाने डोळसपणे कार्यरत असणे आवश्यक आहे. याच सामाजिक जाणिवेतून दै.'पुढारी' संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशन व जैन सोशल ग्रुप (मेन) यांच्या वतीने नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंडस् (नॅब) संस्था सदस्य अंध बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारी (दि.18) शाहूपुरी येथील 'नॅब'च्या सभागृहात हा उपक्रम घेण्यात आला. उपक्रमात प्रथम रक्त तपासणी करण्यात आली. रक्त तपासणी रिपोर्ट आल्यानंतर त्?यावर आधारित आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक गोष्टीची माहिती अंध बांधवांना देण्यात आली.

दरम्यान, गरजू अंध बांधवांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्?यात आली. यावेळी जैन सोशल ग्रुपच्या अध्यक्षा रज्जुबेन कटारिया, सुमित परिख, हरिश शेठ, मनोज शहा, वनेचंद कटारिया, 'नॅब'चे डॉ. मुरलीधर डोंगरे, विजय रेळेकर, डॉ. मीना डोंगरे, केरबा हंडे, सुनील नागराळे, शिवानंद पिसे, जिया मोमीन, रोटरीचे पंडित कोरगावकर, अभिजित भोसले उपस्थित होते. आरोग्य तपासणीसाठी डॉ. उद्यम व्होरा व जीवनधारा ब्लड बँक यांनी विशेष सहकार्य केले.

आरोग्य तपासणीसह औषधोपचार 

शिबिरात रक्तगट, हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, शुगर तपासणी करण्यात आली. हिमोग्लोबिन कमतरता असणार्‍यांना औषधे उपलब्ध करून देण्यात आली.

पहा व्हिडिओ : विद्यार्थ्यांनी CA होण्याचे स्वप्न बाळगावे : C.A डॉ. दिलीप सातभाई

https://youtu.be/239UyoPwamw

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT