शियेत तृतीयपंथीयाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. त्या घरातील सोन्याचे दागिने गायब झाले आहेत तसेच दाराला बाहेरून कडी होती.
त्यामुळे या हा मृत्यू नैसर्गिक की घातपात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सतीश हैबतराव पवार ऊर्फ देवमामा ( वय ४२, सध्या रा. रामनगर, शिये, मूळगाव हुपरी, ता. हातकणंगले ) असे तृतीयपंथी व्यक्तीचे नाव आहे. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थाळाचा पंचनामा करुन तपास करीत आहेत.
याबाबत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, शिये येथील रामनगरमध्ये सतीश पवार हा तृतीयपंथीय गेली दहा वर्षे रहात आहे . तृतीयपंथी असल्याने तो आपले आयुष्य देवीचा जोगता म्हणून जगत होता.
त्यांच्याकडे आनेक लोंकाचे नेहमी येणे जाणे असायचे. त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचे दागिने होते.
तीन वर्षी त्याच्या घरातून या सोन्या चांदीच्या दागिन्याची चोरी झाली होती पण देवाच्या दागिने चोरल्याने देवाचा कोप होईल या भितीने चोरट्याने दागिने आणून परत दारात टाकले होते.
आज सकाळी अमृत पवार हे नाष्टा घेऊन घरी आले. त्यांनी सतीश पवार यांस झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सतीशचा मृत्यू झाल्याचे आढळून आले.
याबाबत तात्काळ शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.
या तृतीयपंथी व्यक्तीच्या मृत्यूबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. ज्यावेळी ही घटना उघडकीस आली त्यावेळी घराला बाहेरून कडी होती. याचबरोबर घरातील सोन्या चांदिचे दागिने गायब झाले आहेत.
दरम्यान या तृतीयपंथीयाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : खासदार मनोज झा यांचे राज्यसभेतील ह्रदयस्पर्शी भाषण एकदा बघाच!
https://youtu.be/4uD7NXUeHQc