कोल्हापूर

Waghapur news | मिरवणुकीस परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ वाघापूर येथे ग्रामस्थांचा ठिय्या

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी मागणाऱ्यांना पोलिसांकडून लेखी उत्तर

पुढारी वृत्तसेवा

मुदाळतिट्टा : वाघापूर (ता. भुदरगड) येथील छत्रपती शंभुराजे प्रतिष्ठान यांच्यावतीने 13 ते 15 मे दरम्यान छत्रपती संभाजी राजेंची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार दि. 15 रोजी पोलीस प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारल्याने गावातील युवकांनी उत्सव मंडपा समोरच ठिय्या मारून आंदोलन केले. यामध्ये युवकांबरोबर महिलांचाही प्रचंड गर्दी होती. गावामध्ये तणावाचे वातावरण होते.

सुमारे दोन तास ग्रामस्थांनी ठिय्या मारून देखील याकडे पोलीस प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलिसांच्या मनमानी कारभाराचा गावच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

रात्री अकरा पर्यंत या घटनेवर काही निर्णय न झाल्याने युवकांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता सर्व दैवतांची शपथ घालून डॉल्बीच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्याचा इशारा दिला आहे.

वर्षभर दलितांनी सुवर्ण समाजामध्ये क्रीडांगणास नाव देण्याच्या कारणावरून तेढ निर्माण झाले. जातीय तेढ निर्माण होऊ नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानगी मागणाऱ्यांना लेखी उत्तर दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोरख चौधर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT