Pune News: पुण्यात नेमकं चाललंय काय? ४ वर्षांच्या चिमुरडीनंतर आता ११ वर्षीय मुलीचा विनयभंग; चाकणमध्ये संतापजनक प्रकार

चाकण जवळील बिरदवडी येथे ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे.
crime news
crime newsfile photo
Published on
Updated on

Pune News

चाकण/पुणे: पुणे जिल्ह्यात अत्याचार आणि खुनाच्या सलग दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याने परप्रांतीयांविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.

एका सराईत नराधम वृद्धाने नसरापूर (ता. भोर) येथे रस्त्याने खेळत जाणाऱ्या साडेतीन वर्षांच्या मुलीला फसवून गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून करण्याची घटना १ मे रोजी घडली. त्यानंतर आता चाकण जवळील बिरदवडी येथे ११ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी परप्रांतीय ३२ वर्षीय संशयीत आरोपीला अटक केली आहे. अरुण गयाप्रसाद मिश्रा असे त्याचे नाव आहे.

crime news
Beed minor girl kidnapping: नात्याला काळिमा! मामाच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

​शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी घरात कोणी नसल्याने घराला कुलूप लावून आपल्या काकाच्या घरी जात होती. मुलगी एकटी असल्याचे पाहून आरोपीने घराच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित मुलीने कसाबसा तेथून पळ काढल्याने ती बचावली. आपबिती पीडित मुलीने वडिलांना सांगितली. वडीलांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून नराधमाच्या मुसक्या आवळल्या. संशयीत ​आरोपी विरुद्ध पॉक्सो कायद्या अंतर्गत उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

महाळुंगेत तीन वर्षीय चिमुरड्याचा अनैसर्गिक अत्याचारानंतर खून

दक्षिण महाळुंगे एमआयडीसी परिसरात तीन वर्षीय बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याची निघृण हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १) उघडकीस आली. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बालक सायंकाळी घरासमोर खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. बराच वेळ बालक न दिसल्याने कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला; मात्र काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम सुरू केली. प्राथमिक टप्प्यात परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये अल्पवयीन आरोपी बालकाला फूस लावून नेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून संशयिताचा माग काढण्यास सुरुवात केली. दरम्यान, पोलिसांना परिसरातील एका खोलीत बॅगेमध्ये बालकाचा मृतदेह आढळून आला. बालकाचा मृतदेह मिळाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. प्राथमिक तपासात बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

crime news
नातेसंबंधाला काळिमा! १५ वर्षीय मुलाकडून अडीच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; परिसरात संतापाची लाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news