कोल्हापूर

हातकणंगलेत कॉलमचाच उड्डाण पूल उभारणार : नितीन गडकरींचे आश्वासन

अनुराधा कोरवी

हातकणंगले: पुढारी वृत्तसेवा : दहा वर्षापासून हातकणंगले येथील उड्डाण पूल कॉलमचा की भरावाचा या वादात काम थांबलेले आहे. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग झाल्यामुळे हातकणंगले येथे कॉलमचा उड्डाण पूल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी, दादा गोरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. याबाबत सकारात्‍मक विचार करू, असे आश्‍वासन या वेळी गडकरी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

सांगली- कोल्हापूर रस्त्याच काम सुरू असताना हातकणंगले आणि जयसिंगपूर येथील उड्डाण पुलावरून  वाद निर्माण झाला होता. या दोन्ही ठिकाणी भरावाचे पुल केल्यामुळे शहराचे दोन तुकडे पडणार या विरोधात मोठे जन आंदोलन उभा राहिले होते. तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी हातकणंगले येथे भरावा ऐवजी कॉलमचा उड्डाण पूल उभारू, असे आश्वासन दिले होते. परंतु, त्याची परिपूर्ती झालेली नाही.

सध्या खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाच्या यादीत समावेश झालेला आहे.  या मार्गासाठी भरीव निधीची तरतूद केलेली आहे. परंतु, हातकणलेतील उड्डाण पूलासंदर्भात अस्पष्टता असल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिष्टमंडळासोबत भेटी घेतली. हातकणंगले येथे भरावा ऐवजी कॉलमचा उड्डाणपूल करावा, अशी विनंती त्‍यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत येथे शहराचे दोन तुकडे न करता कॉलमचा उड्डाणपूल करू, असे  आश्वासन गडकरी यांनी या वेळी दिले. जयसिंगपूरबद्दलही अशाच पद्धतीने योग्य निर्णय घेऊ, अशी ग्‍वाही गडकरी यांनी दिली.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT