कोल्हापूर

जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेकडून प्रस्ताव मागविला : राजेश क्षीरसागर

backup backup

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा या स्टुडीओची जागा लता मंगेशकर यांनी खरेदी केली होती. या स्टुडिओतील निम्मी जागा त्यांनी काही वर्षांपूर्वी विकली असून, उर्वरित जागा श्री महालक्ष्मी स्टुडीओज एल.एल.पी. या फर्मने कायदेशीररित्या खरेदी केली आहे. हा व्यवहार कायदेशीर असला तरी या स्टुडिओबाबत कोल्हापूरवासियांच्या भावना जोडल्या गेल्या असून, खरेदीदार कंपनीस नियमाप्रमाणे शासनाने पर्यायी जागा द्यावी. कोल्हापूरच्या अस्मितेशी निगडीत जयप्रभा स्टुडिओची जागा शासनाने ताब्यात घेवून ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन आणि स्टुडिओचा विकास करावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याकडे केली.

आज मुंबई येथे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची राजेश क्षीरसागर यांनी भेट घेतली. याबाबत एकनाथ शिंदे यांना माहिती देताना राजेश क्षीरसागर यांनी जयप्रभा स्टुडिओच्या जागेशी जनभावना जोडल्या गेल्या असून या जागेतील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन व्हावे, यासाठी पर्यायी जागा स्वीकारून स्टुडिओची जागा शासनाच्या ताब्यात देण्यास सहमती द्यावी, अशा सूचना खरेदीदार कंपनीच्या सर्वच भागीदारांना दिल्या आहे. त्यांनी यास सहमती दर्शवित कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे शासकीय नियमाप्रमाणे पर्यायी जागा देवून जागा ताब्यात घेण्याबाबत लेखी मागणी केली आहे.

सदर जागेचा समावेश कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने हेरीटेज वास्तू केला आहे. या ठिकाणी चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, लता मंगेशकर यांचे स्मारक व्हावे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे, अशी समस्त कोल्हापूरवासीयांची इच्छा आहे. मुलांनी हा स्टुडिओ खरेदी करण्यात भागीदारी गुंतवली असली तरी जनभावनाचा आदर करून योग्य त्या सूचना आपण कंपनीच्या सर्वच भागीदारांना दिल्या आहेत. नगरविकास विभागाने नियमाप्रमाणे पर्यायी जागा देवून जयप्रभा स्टुडिओची जागा शासनाने ताब्यात घेवून विकसित करावी, स्टुडिओ विकसित करून, याठिकाणी पूर्ववत चित्रपट निर्मिती स्टुडिओ उपलब्ध करून देवून हा विषय कायमस्वरूपी मार्गी लावावा, अशी मागणी केली.

यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी राजेश क्षीरसागर यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. खरेदीदार कंपनीस शासन नियमाप्रमाणे पर्यायी जागा देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून प्रस्ताव महापालिकेस सादर करण्यास त्यांनी सांगितले. यासह जयप्रभा स्टुडीओची जागा कायदेशीररीत्या मुलांच्या भागीदार कंपनीने खरेदी केली असताना या जागेबाबत राजेश क्षीरसागर यांनी करवीरवासीयांच्या भावना समजून घेवून, जनभावनांचा आदर आणि कलाकारांप्रती असलेली आत्मियता जपून जागा शासनाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला व पुढाकार घेवून याबाबत पाठपुराव करत असल्याबद्दल कौतुक व्यक्त केले.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT