गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला जम्मू काश्मीरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा | पुढारी

गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला जम्मू काश्मीरच्या सुरक्षा स्थितीचा आढावा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जम्मू काश्मीरमध्ये सुरु असलेल्या विकासकामांबरोबरच या भागातील सुरक्षा स्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी आढावा घेतला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख मनोज नरवणे तसेच वरिष्ठ लष्करी अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय सीमारेषा तसेच प्रत्यक्ष ताबा रेषेवरील सुरक्षा स्थितीवर यावेळी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. कलम ३७० संपुष्टात आणल्यापासून जम्मू काश्मीरवर केंद्राचे नियंत्रण आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्र सरकारने कलम ३७० संपुष्टात आणले होते, त्याचवेळी जम्मू – काश्मीर आणि लडाख अशा दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती.

हेही वाचलतं का?

Back to top button