कोल्हापूर

कोल्हापूर : राधानगरीत अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक गंभीर

दिनेश चोरगे

राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला त्याचा सख्खा भाऊ गंभीर जखमी झाला. बंडोपंत आनंदा पाटील (वय ५०, रा.घोटवडे ता.राधानगरी) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात आज (दि.२२) राधानगरी तहसील कार्यालयापासून काही अंतरावर दुपारी दोनच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी,  बंडोपंत आणि विश्वास दोघे भाऊ कामानिमित्त दुचाकीवरून (क्र. एमएच -०९-सी बी- ५४४२) राधानगरी तहसील कार्यालयात आले होते. दुपारी दोनच्या सुमारास आपले काम आटपून गावी परत जात असताना तहसील कार्यालयापासून काही अंतरावर कोकणातून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये बंडोपंत यांचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेले त्यांचे भाऊ  विश्वास गंभीर जखमी झाले. जखमीला तात्काळ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक व्ही.एन.घाटगे व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांनी तात्काळ भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT