कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत दिल्यानंतर महापुराचा (#kolhapurflood) विळखा थोडा सैलावत आहे. कोल्हापूरमधील पूर (#kolhapurflood) पूरस्थिती ओसरल्यानंतर आरोग्य, तसेच इतर समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत.
अधिक वाचा
यामध्ये कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुप (KDMG) अग्रेसर असून विविध क्षेत्रांतील ३० व्यावसायिक व सामाजिक संस्थांचा यात सहभाग घेतला आहे. या उपक्रमांना 'पुढारी' रिलिफ फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभत आहे.
अधिक वाचा
याअंतर्गत महासैनिक दरबार हॉल येथे सेंट्रल किचन संकल्पना राबवण्यात आली असून दररोज ४५०० लोकांना जेवण पुरवण्यात येत आहे. शहरात २५ ठिकाणी पूरग्रस्तांना स्थलांतरित करण्यात आले असून येथे या विशेष उपक्रमाचा लाभ होत आहे.
त्याचबरोबर पूरस्थितीतील बचावकार्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अपंग, वृद्ध व आजारी व्यक्ती, तसेच पाळीव प्राणी यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
अधिक वाचा
महानगरपालिकेसोबत मुंबईहून आलेल्या विशेष टीमने स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे. या सर्व उपक्रमांना केडीएमजी आणि 'पुढारी' रिलिफ फाऊंडेशन यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
हेही वाचलंत का?
पाहा : पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा