कोल्हापूर

कोल्हापूर: अंबपवाडी येथे अवैध व्यवसायावर कारवाई न करता पोलिस फिरले माघारी

अविनाश सुतार

कासारवाडी : पुढारी वृत्तसेवा: अंबपवाडी (ता. हातकणंगले) येथे अवैद्य दारू व्यवसायाविरुध्द तक्रारी झाल्याने पोलीस पथकाने भेट दिली. पण पोलीस कारवाई न करताच रिकाम्या हाताने परत फिरल्याने गावातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा होती.

अंबपवाडी येथे अवैध दारू व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे गावातील व परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याने ग्रामपंचायतीने पेठवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार देऊन दहा दिवस झाले, तरी हे व्यवसाय सुरू होते. गावातील सामाजिक कार्यकर्ते, व नागरिकांनी जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयात भ्रमणध्वनीवर अनेक वेळा संपर्क केला. वारंवार होणाऱ्या तक्रारीमुळे शुक्रवारी नागरिकांनी ११२ नंबर डायल करून तक्रार केल्यानंतर पोलीस पथकाने गावातील एका दारू अड्यावर भेट दिली. पण येथे पोलिसांना मुद्देमाल सापडला नसल्याचे सांगत पथक कारवाई न करताच रिकाम्या हाताने परतल्याने नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू होती. याची दखल जिल्हा पोलीस प्रमुख घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT