कोल्हापूर : मोटारीचा ताबा सुटल्याने घुणकीजवळ अपघात; एकजण ठार | पुढारी

कोल्हापूर : मोटारीचा ताबा सुटल्याने घुणकीजवळ अपघात; एकजण ठार

किणी; पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून कोल्हापुरकडे निघालेल्या भरधाव मोटारीचा ताबा सुटल्याने दुभाजकावर आदळली. या अपघातात सुभाष ईश्वरा पाटील (वय ४८, रा. मलतवाडी, ता. चंदगड) हे ठार झाले. तर लक्ष्मण लांडे हे जखमी झाले आहेत. हा अपघात आज (दि.३१) सकाळी साडेसहा वाजता पुणे-बंगळुरू महामार्गावर घुणकी जवळ घडला.

सुभाष पाटील हे विलास लक्ष्मण लांडे यांचेसह पुण्याहून आपल्या मोटार (क्र. एम एच १४-एफएस ५८३५) घेऊन चंदगडला निघाले होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ते किणी-घुणकीच्या दरम्यान आले असता रस्त्याचे काम सुरू असणाऱ्या दुभाजकाला चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांची मोटार महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन धडकली. यानंतर कार झाडाच्या बुंध्यावर जाऊन आदळली. यामुळे गाडीत असणाऱ्या सुभाष पाटील व लक्ष्मण लांडे गंभीर जखमी झाले. सुभाष पाटील यांच्या डोक्यास गंभीर मार लागून मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button