कोल्हापूर

कोल्हापूर : खानापूर तलाव ओव्हरफ्लो

मोहन कारंडे

सोहाळे; सचिन कळेकर : आजरा तालुक्यातील चित्री मध्यम प्रकल्पासह धगरवाडी, एरंडोळ लघु पाटबंधारे तलावांपाठोपाठ रविवार (दि. ६) रोजी सकाळी ७ वाजता खानापूर लघु पाटबंधारे तलाव पुर्ण क्षमतेने भरला. खानापूर तलावाच्या सांडव्यावरून ५ क्यूसेक्सने विसर्ग सुरु आहे. एकापाठोपाठ एक तालुक्यातील प्रकल्प तुडूंब होत असल्याने तालुकावासियांसह शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त होत आहे. चित्री मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून १२० व विद्युतगृहासाठी १८० क्युसेक्सने विसर्ग सुरु आहे. तर आंबेओहोळ मध्यम प्रकल्पात १२३४ द. ल. घ. फु. पाणीसाठा म्हणजेच ९९.५० टक्के झाला आहे.

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील किटवडे परिसराला पावसाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी चेरापुंजीशी स्पर्धा करणारा पाऊस होतो. पश्चिम भागात होत असलेल्या पावसांमुळे तालुक्यातील चित्री मध्यम प्रकल्प, धनगरवाडी, एरंडोळ व खानापूर लघुपाटबंधारे प्रकल्प सुरुवातीलाच तुडूंब होतात. परिणामी पावसामुळे वेळेत व लवकर प्रकल्प भरण्यास मदत होतो. यंदा २२ जुलै रोजी धनगरवाडी प्रकल्प तुडूंब भरला. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून सध्या १२० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यानंतर पाठोपाठ २८ जुलै रोजी एरंडोळ तलाव भरले. यामधून सध्या ९० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

शनिवारी (दि. ५) चित्री मध्यम प्रक्लप तुडूंब भरले. आजपर्यंत चित्री मध्यम प्रकल्प परिसरात १९५४ मि.मी. पाऊस झाला असून गेल्या २४ तासात ३० मि.मी. पाऊस झाला आहे. १२४० द. ल. घ. फु. क्षमतेच्या आंबेओहोळ मध्यम प्रकल्पात १२३४ द. ल. घ. फु. पाणीसाठा झाला आहे. ऊचंगी प्रकल्पांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. एकंदरीत तालुक्यातील प्रकल्प तुडूंब होत असल्याने तालुकावासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT