गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : काळम्मावाडी प्रकल्पातून कोल्हापूरला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या थेट पाईपलाईनचे अंतिम टप्प्यातील अपूर्ण काम युद्धपातळीवर सुरू आहे. गुरुवारी सोळांकुर गावातील काम पूर्ण झाल्यानंतर शनिवारी (दि.१) मांगेवाडी- आकनूर दरम्यानच्या वळणावरील पाईप जोडण्याचे काम गतीने सुरू होते.
गेले दोन वर्षे सोळांकुर ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे सोळांकूर गावातून जाणाऱ्या पाईपलाईनचे काम रेंगाळले होते. अखेर गुरुवारी हे काम पूर्ण झाले. सोळांकुरकडून निपाणी – देवगड राज्य मार्गाशेजारून आलेली ही पाईपलाईन मांगेवाडी गावाजवळ वळण घेऊन अकनूर रस्त्याकडे येते. तिथून मांगोली फाट्यावर या पाईपलाईनला पुन्हा वळण घ्यावे लागते. याच वळणावर पाईपलाईन जोडण्याचे काम शनिवारी सुरू होते. सरळ आलेल्या पाईपलाईनला एल साईजमध्ये वेल्डिंग करून मांगोली रस्त्याच्या बाजूने वळविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. जीकेसी कंपनीने या कामासाठी दुतर्फा रस्ता बंद करून पाईपलाईनचे जोडकाम पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कामाला लावली होती.
हेही वाचलंत का ?