कोल्हापूर : हुपरी परिसरात मुले पळवल्याची अफवा; पालकांत चिंता | पुढारी

कोल्हापूर : हुपरी परिसरात मुले पळवल्याची अफवा; पालकांत चिंता

हुपरी: पुढारी वृत्तसेवा : हुपरी परिसरात मुले पळवून नेणारी टोळी आल्याची जोरदार अफवा पसरली आहे. त्यातच काहींनी सोशल मीडियावर रेंदाळ येथे मुले पळवून नेताना एका महिलेला पकडले, अशी पोस्ट व्हायरल झाल्याने पालकांत चिंतेचे वातावरण पसरले. दरम्यान, पोलिसांनी असा प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुले पळवणाऱ्या टोळीबाबत सध्या सर्वत्र अफवा पसरल्या आहेत . त्यामुळे या भागातील शाळांनीही खबरदारी घेतली आहे. पालकांना सूचना दिल्या आहेत. या अफवा की सद्यस्थिती याबाबत लोकांत संभ्रमावस्था असताना शुक्रवारपासून सोशल मीडियावर रेंदाळ येथून मुले पळवून नेताना एका महिलेला पकडल्याची पोस्ट फोटोसह टाकण्यात आली. ही पोस्ट व्हायरल झाली. त्यामुळे पालकांत चिंता पसरली.  मात्र, याबाबत खात्री केली असता तो फोटो आणि पोस्ट फेक असल्याचे स्पष्ट झाले.

अफवा पसविणारी पाेस्‍ट टाकणार्‍याचा शाेध सुरु

यासंदर्भात हुपरी पोलीस ठाण्याचे सपोनि पंकज गिरी यांच्याशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोशल मीडियावर अशाप्रकारे बेजबाबदार पोस्ट टाकणे, गुन्हा आहे. ही पोस्ट टाकणाऱ्याचा शोध घेऊ, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :  

Back to top button