कोल्हापूर

कोल्हापूर: आदमापूर येथे बाळूमामा भंडारा यात्रेस सुरूवात

अविनाश सुतार

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेस हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात आज (दि. १२) प्रारंभ झाला.

भंडारा यात्रा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. आज रंगपंचमी दिवशी देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते समाधीपूजन, अभिषेक करण्यात आला. याप्रसंगी हरी भजन, धनगरी ढोल वादन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर नेत्रदिपक विद्युत रोषणाई करण्यात आली. आज पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उपवास करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी, पुंडलिक व्होसमनी, रामण्णा मरेग्रुद्री, तमाण्णा मासरेडी, संदीप मगदूम, विजय गुरव, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, नानासाहेब पाटील, बाळकृष्ण परीट आदीसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT