कोल्हापूर

Kolhapur Flood | महापूर आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज : नगराध्यक्षा. सौ.डांगे

आपत्ती व्यवस्थापन ही आपलीही जबाबदारी आहे, समजून नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : महापूरासारख्या नैसर्गिक आपत्ती अचानक उद्भवत असल्या, तरी त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी आणि जनसहभाग महत्त्वाचा आहे. कुरुंदवाड पालिका आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज असून नागरिकांच्या सहकार्याने कसलेही संकट आले तर प्रशासन त्याचा प्रभावीपणे सामना करेल असा विश्वास नगराध्यक्षा सौ. मनीषा डांगे यांनी व्यक्त केला.

दरम्यान शिवतीर्थ चौकातील रस्ता गेल्या अनेकवर्षांपासून दुरुस्ती केली नसल्याने त्याठिकाणी महापुराचे पाणी येते त्याठिकाणी गेल्यावर्षी अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे,तो रस्ता दुरुस्त करावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस द्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा सुनील कुरुंदवाडे यांनी देताच नागरिकांनी हा विषय उचलून धरला, मुख्याधिकारी देसाई यांनी याबाबत तात्काळ कारवाई करू असे आश्वासन दिले.

कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित आपत्ती व्यवस्थापनच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, पोलीस निरीक्षक संतोष माने आदी उपस्थित होते, यावेळी बोलताना मुख्याधिकारी देसाई म्हणाले आपत्तीमध्ये प्रशासनाची जबाबदारी मोठी असते. आपत्ती व्यवस्थापन ही आपलीही जबाबदारी आहे, समजून नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.

या बैठकीत उपनगराध्यक्ष गायकवाड,अक्षय आलासे,तानाजी आलासे, अयुब पट्टेकरी, शाहीर आवळे, रमेश भूजूगडे, दादासाहेब पाटील, मंडळ अधिकारी स्नेहा कुंभार व नागरिकांनी सूचना मांडत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेविका अलका मधाळे, सुनंदा आलासे, रामदास मधाळे, अयुब पट्टेकरी, दिलीप बंडगर, दीपक पोमाजे,आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT