कोल्हापूर

कोल्हापूर: मलकापुरातील ‘त्या’ आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये; ठाकरे गटाचे बार असोसिएशनला निवेदन

Shambhuraj Pachindre

सरूड; पुढारी वृत्तसेवा : मलकापूर येथे गतिमंद असाह्य मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने शाहूवाडी तालुक्याची मान शरमेने खाली गेली आहेत. मानवतेला काळिमा फासणाऱ्या घटनेचा पोलीस प्रशासनाने सखोल आणि निस्पक्ष तपास करावा. तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे याचे वकीलपत्र कोणाही विधिज्ञाने स्वीकारू नये, अशा आशयाचे निवेदन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शाहूवाडी बार असोसिएशनला मंगळवारी (दि.३) देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख दत्तात्रय पोवार, उपप्रमुख निवास कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने न्यायालय परिसरात बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले.

अत्याचाराच्या घटनेत गरीब आणि दिव्यांग युवतीसह तिच्या कुटुंबियांचे जीवन उध्वस्त झाले आहे. नराधम आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना पक्ष रस्त्यावर उतरेल. दरम्यान आरोपीला केलेल्या गुन्ह्याची अधिकाधिक शिक्षा व्हावी, यासाठी बार असोसिएशनने विशेष पुढाकार घ्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर गणेश पाटील, वैभव बोटागंळे, राजाराम पाटील, युवराज पवार, प्रकाश लोखंडे आदी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या सह्या आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT