कोल्हापूर

आंबोली घाटातील दरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

Shambhuraj Pachindre

आंबोली; पुढारी वृत्तसेवा : आंबोली घाटात दरड कोसळलेल्या ठिकाणी आज मंगळवारी (ता.२०जून) संध्याकाळी ७ च्या सुमारास सुमारे २०० फूट खोल दरीत एक अज्ञात मृतदेह दिसून आला. मात्र, तो मृतहेद दरीचा धोकादायक आणि खोल भाग आहे. तसेच सायंकाळी उशीर झाल्याने उद्या (दि.२१) रेस्क्यू मोहीम राबवत सदर मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात येणार आहे. अशी माहिती आंबोली पोलीसांनी दिली आहे.

दरम्यान, सावंतवाडीहून चौकुळ येथे माघारी येणाऱ्या एका ग्रामस्थाला आंबोली घाटातील दरड कोसळलेल्या ठिकाणी संध्याकाळी ७ च्या सुमारास दरीत एक अज्ञात मृतदेह अडकलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबतची माहिती ग्रामस्थाने आंबोली पोलीसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ठिकाणाची पाहणी केली.

यावेळी पोलिसांना अज्ञात मृतदेह दरीत अडकलेला दिसून आला. तसेच तात्काळ आंबोली रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले होते. परंतु, दरीचा तो भाग अतिशय खोल धोकादायक असल्याने तसेच रात्र झाल्याने रेस्क्यू मोहीम राबवणे हे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे रेस्क्यू पथकाने उद्या (दि.२१) सकाळी रेस्क्यू मोहीम राबवून मृतदेह बाहेर काढणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे उद्या रेस्क्यू टीमने तो मृतदेह दरीतून बाहेर काढल्यावर नेमका कोणाचा आहे हे स्पष्ट होईल. तसेच तो मृतदेह किती दिवसापूर्वीचा आणि दरीत आला कसा आला याचा तपास होणार आहे. उद्या आंबोली पोलीस, सावंतवाडी पोलीस यांच्या उपस्थितीत तो मृतदेह बाहेर काढण्यात येणार आहे.

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT