Tadoba National Park : ताडोबातील वाघीणीचा तलावात पोहतानाचा व्हिडिओ व्हायरल!

Tadoba National Park : ताडोबातील वाघीणीचा तलावात पोहतानाचा व्हिडिओ व्हायरल!

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : सध्या अर्धा जून महिना निघून गेला आहे. पावसाचा अद्याप थेंब देखील पडला नाही. दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. नागरीकांची वाढत्या तापमानामुळे लाही लाही होत आहे, उकाडा असह्य होत आहे. वन्यप्राणीही उकाड्या पासूनच सुटले नाहीत. मानवाप्रमाणे उकाड्यापासून बचाव करण्यासाठी थंड ठिकाणी आसरा घेतात. असाच एक ताडोबातील आगरझरी परिसरात तलावातील "छोटी मधू" नावाच्या वाघिणीचा पाण्यात मनसोक्त विहार करतानाचा फोटो सोमवारी (दि. २०) व्हायरल झाला आहे.

वाघांना माणसासारखं पोहता येत नाही, पण पाण्यातून तो नक्कीच मार्गक्रमण करू शकतो. तासनतास पाण्यात एकाच ठिकाणी डुंबलेला वाघ आपण पाहिलाय. सोमवारी (दि. १९) ताडोबातील "छोटी मधू" या वाघिणीला उकाडा असह्य झाल्यामुळेच तिला तलावातील पाण्यात आश्रय घ्यावा लागला. उन्हाच्या झळा असह्य झाल्यामुळे ती बराच वेळ पाण्यात बसली आणि पाण्यातून मार्गक्रमण करत जंगलाच्या दिशेने वळली. हा अतिशय दुर्मिळ क्षण टिपलाय वन्यजीवप्रेमी यांनी ताडोबात टिपला आहे.

वाघाचे शिकार करतानचे फोटो अनेकदा पाहिले आहेत. तसेच त्यांच्या अधिवासात आराम करताना दाखवणारे व्हिडीओ नेहमीच पाहिले आहेत, पण वाघाला पाण्यात डुंबताना पाहणे तसे दुर्मिळच आहे. मात्र ताडोबातील तलावात हा दुर्मीळ फोटो नेटकऱ्याना चांगलाच लुभावत आहे. फार वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका वाघाला जेरबंद करून नंतर त्याला बोटीतून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या वाघाने पिंजऱ्याचे दार उघडताच बोटीतून थेट पाण्यात उडी मारली आणि पाण्यातून मार्ग काढत तो जंगलात निघून गेला. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आगरझरी बफर क्षेत्रातील "छोटी मधू" या वाघिणीने याच प्रसंगाची आठवण करून दिली.

उन्हाच्या झळा जिथे माणसांनाच सहन होत नाही, तिथे प्राण्यांना त्या कशा सहन होणार! मग या वाघिणीने थेट तलावाकडे धाव घेतली आणि पाण्यात मनसोक्त स्वच्छंद विहार केला. उन्हाचा दाह शांत झाल्यानंतर ती पाण्याबाहेर निघाली आणि जंगलाकडे धूम ठोकली. वन्यजीव व छायाचित्रकार  हे नेहमीच वाघांच्या वेगवेगळ्या अदा टिपत असतात आणि हा दुर्मिळ क्षण त्यांनी टिपण्यासाठी सणाचा ही विलंब केला नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news