कोल्हापूर

‘अब्दुललाट ग्रा.पं. अभ्यास सहलप्रकरणी राळेगणसिद्धी येथे बेमुदत आंदोलन करणार’

backup backup

अब्दुललाट, पुढारी वृत्तसेवा : अब्दुललाट (ता-शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने निव्वळ कागदोपत्री राळेगणसिद्धी व बारामती येथे शेतकरी अभ्यास सहल नेल्याचे दाखवून वित्त आयोगाची निधी संगनमताने लाटण्यात आला होता. या प्रकरणी चौकशीमध्ये दोषी आढळूनदेखील दोषींना पाठीशी घालत येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्‍यास  दुर्लक्ष करत असल्याने शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या विरोधात ज्‍येष्‍ठ समाज सेवक आण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावी जाऊन बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती तक्रारदारांनी पत्रकार परिषदेत दिली.  या वेळी तक्रारदार सतीश कुरणे, दीपक वराळे, संजय कोळी आदी उपस्थित होते.

या प्रकरणी तक्रारदारांनी सांगितले की, बोगस शेतकरी अभ्यास सहलीमध्ये राळेगणसिद्धी हे ठिकाण अब्दुललाट ग्रामपंचायतीच्या वतीने दाखवण्यात आले होते. निव्वळ कागदोपत्री शेतकरी अभ्यास सहल दाखवून सरपंच, ग्रामविकास अधिकारी व लोकप्रतिनिधी संगनमताने वित्त आयोगाची निधी लाटली असल्याचे संशय व्यक्त करत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे वर्षभरापूर्वी तक्रार दाखल केली होती.

यावर गटविकास अधिकारी यांनी चौकशी अधिकारी नेमून चौकशी केली.

या चाौकशीत शेतकरी अभ्यास सहल हे बोगस आढळून आले.

या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी, सरपंचांसह लोकप्रतिनिधी दोषी आढळून आले होते.

दोषींवर गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून कारवाई करत गुन्हा नोंद होणे गरजेचे हाेते.

मात्र मागील वर्षभरापासून दोषींवर कारवाई वा गुन्हा नोंद करण्यास शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वेळ काढूपणा करत क्षुल्लक व कागदोपत्री खेळ करत दिरंगाई करत आहेत, असेही ते म्‍हणाले.

या प्रकरणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामपंचायत विभागाकडे देखील अनेक वेळा पाठपुरावा करून देखील दोषींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाविराेधात ज्‍येष्‍ठ समाज सेवक आण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावी जाऊन बुधवार दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी बेमुदत आंदोलन करण्यात येणार असल्‍याचेही तक्रादारांनी सांगितले.

हेही वाचलं का?

पहा व्हिडीओ : धनंजय माने पुन्हा आले : अशोक मामांचे फेमस डायलॉग 'अशी ही बनवा बनवी' ला 33 वर्ष पूर्ण

SCROLL FOR NEXT