सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : तोंडवळी-तळाशील नजीकच्या वाळू उत्खननावर ग्रामस्थ आक्रमक, प्रजासत्ताक दिनी खाडीपात्रात उपोषण

backup backup

आचरा; उदय बापर्डेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तोंडवळी-तळाशील समोरील खाडीपात्रात दिवस रात्र सुरु असणाऱ्या वाळू उत्खननावर कठोर कारवाई करून तात्काळ उत्खनन थांबवावे, तळाशील किनारपट्टीचा भूभाग खचून खाडी पात्रात तयार झालेला सॅन्डबार ड्रेझरच्या साहाय्याने उपसा करून पुन्हा किनारपट्टीवर टाकण्यात यावा.

यासह अन्य मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेऊन कालावल खाडीपात्रात 26 जानेवारी पासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुशे व मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी तळाशील तोंडवळी येथे दाखल होत हे उपोषण मागे घ्या अशी विनंती देखील केली. मात्र ग्रामस्थ आपल्या भुमिकेवर ठाम आहेत.

दरम्यान, तळाशील तोंडावळी येथे ग्रामस्थांनी उपोषण करू नये असे आवाहन करण्यासाठी प्रांताधिकारी ऐशवर्या काळुशे, स्वाती देसाई, मालवण तहसीलदार वर्षा झालटे, मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्याक बंदर निरीक्षक सुहास गुरव, अरविंद परदेशी, मंडळ अधिकारी अजय परब, आचरा तलाठी संतोष जाधव दाखल झाले होते. यावेळी तळाशील व तोंडवळी येथील ग्रामस्थांनी आक्रमक स्वरूपात भूमिका मांडली.

वाळू व्यवसायिकांकडून आम्हा ग्रामस्थांना धमकीही देण्यात आली आहे. असेही यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. कालावलं खाडीपात्रात सुरु असलेला वाळू उपसा बंद झालाच पाहिजे, परप्रांतीय वाळू कामगार यांचा गावात सुरु असलेला वावर, यामुळे गावात गुन्हे घडण्याची शक्यता असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनधिकृत वाळू बंद व्हावीच, सोबत या भागात कोणतेही अधिकृत टेंडर लावण्यात येऊ नये. तळाशील वाडी समोरील किनारपट्टी खचून वाहून गेलेली वाळू पुन्हा किनाऱ्यावर टाकली जावी. वाळू चोरीवर कारवाईसाठी गावात कायमस्वरूपी महसूल व पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत अशा विविध मागण्या लावून धरल्या होत्या.

ठोस कारवाई नंतरच उपोषण मागे घेण्यावर ग्रामस्थ ठाम

दरम्यान प्रांतधिकारी यांनी बेकायदेशीर वाळूवर कारवाईसाठी पथक नेमते तसेच अनधिकृत बोटी आढळून आल्यास त्यावरही कारवाई करते असे अश्वस्थ केले, खाडी किनाऱ्यावरील बंधऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वरिष्ठ स्थरावर पत्रव्यवहार करते तोपर्यंत आपण पुकारलेले खाडीपत्रातील उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली मात्र ग्रामस्थांनी गेली अडीज वर्षे आम्ही शासन दरबारीं मगण्या घेऊन फिरतो आहोत मात्र आतापर्यंत आश्वासनापुढे काहीच झालेले नाही. त्यामुळे जोपर्यंत अनधिकृत वाळू उपसा बंद होत नाही तोपर्यंत खाडीपत्रातील पुकारलेले उपोषणापासून मागे हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले

तळाशील ग्रामस्थ खाडीपत्रातील उपोषणासाठी गोपाळकृष्ण मंदिरात जमून उपोषण चालू करण्यासाठी तळशील वरचीवाडी येथे खडीपात्रात उतरणार आहेत. जोपर्यंत ठोस कारवाई नाही तोपर्यंत खाडी पत्रातून बाहेर न पडण्याचा निर्धार तळाशील ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT