म्हसळा; पुढारी वृत्तसेवा : म्हसळा तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींपैकी लेप, संदेरी, तोराडी, तोंडसुरे या चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले. घोणसे ग्रामपंचायतीमध्ये रमेश धोंडू कानसे अपक्ष तर देवघर ग्रामपंचायतीमध्ये सौजन्या सुजित पोटले या गाव विकास आघाडी पॅनलमधून सरपंचपदी निवडून आल्या आहेत.
तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामधील 7 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. 18 डिसेंबर रोजी 6 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. लेप, संदेरी, तोराडी, तोंडसुरे या चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळाले. घोणसे ग्रामपंचायतमध्ये रमेश कानसे अपक्ष म्हणून सरपंचपदी निवडून आले आहेत. तर देवघर ग्रामपंचायतमध्ये सौजन्या पोटले या गाव विकास आघाडी पॅनलच्या सरपंच उमेदवार निवडून आल्या आहेत. शिंदे गटाने तोंडसुरे व तोराडी या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदासाठी उमेदवार उभे केले होते. तेथे दोन्ही सरपंच पदाचे उमेदवार पराभूत झाले असून तोंडसुरे मध्ये 2 सदस्य तर तोराडी येथे 1 सदस्य निवडून आला आहे.
तालुक्यातील बिनविरोध झालेल्या 7 ग्रामपंचायतींपैकी काळसुरी, रेवली, कणघर, फळसप या 4 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित होणार आहे. तर कांदलवाडा आणि निगडी या ग्रामपंचायतींमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सत्ता प्रस्थापित होणार आहे. तसेच खरसई ग्रामपंचायतमध्ये स्थानिक आघाडीला बिनविरोध घोषित करण्यात आले आहे.
1) लेप – स्नेहा संजय शिगवण
2) संदेरी – शुभांगी विलास पाष्टे
3) तोराडी – गुलाब अरविंद पवार
4) तोंडसुरे – सुरेश भिकू महाडिक
5) देवघर – सौजन्या सुजित पोटले (गाव विकास आघाडी)
6) घोणसे – रमेश धोंडू कानसे (अपक्ष)
हेही वाचा :