संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनाचे आठवडाभराआधीच सूप वाजणार | पुढारी

संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनाचे आठवडाभराआधीच सूप वाजणार

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा- संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे निर्धारित कालावधीच्या एक आठवडाभरापूर्वीच म्हणजे येत्या २३ तारखेला सूप वाजणार असल्याची माहिती आज ( दि. २०) सूत्रांनी दिली. विविध मुद्यांवरील गदारोळामुळे उभय सदनांचे कामकाज सुरळीतपणे चाललेले नाही. त्यामुळे अधिवेशन लवकर संपविण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार येत्या 29 डिसेंबरपर्यंत संसदेचे कामकाज चालणार होते. अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील चीनी घुसखोरीचा प्रयत्न, कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे वादग्रस्त वक्तव्य, मौलाना आझाद शिष्यवृत्ती बंद करणे आदी मुद्यांवरुन विरोधक आक्रमक आहेत.

मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीज विधेयक संसदीय समितीकडे पाठविले….

दरम्यान बहुराज्य सहकारी सोसायट्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणणे आणि सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने लोकसभेत सादर करण्यात आलेले मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीज विधेयक अधिक विचारविमर्शासाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यात आले आहे. विरोधी पक्षांनी विधेयकातील तरतुदींना आक्षेप घेतल्यामुळे हे विधेक संसदीय समितीकडे पाठविण्याचा निर्णय सरकारने घेतला.

हेही वाचा : 

 

Back to top button