कोकण

Ratnagiri News : मंडणगड नगरपंचायतीवर पाण्यासाठी हंडा मोर्चा

अविनाश सुतार

मंडणगड: पुढारी वृत्तसेवा: मंडणगड शहराच्या पाणीप्रश्नी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांसह महिलांनी आज (दि. २३) मंडणगड नगरपंचायतीवर हंडामोर्चा (Ratnagiri News)  काढला. सत्ताधारी व प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देत व हंडे वाजवत आंदोलक नगरपंचायतीच्या कार्यालयात धडकले. महिला आंदोलकांनी ठिय्या मारत पाणीप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत जागेवरून उठणार नसल्याची भूमिका घेतली.

यावेळी (Ratnagiri News)  विरोधी गटाचे नेते, नगरसेवक विनोद जाधव, नगरसेवक आदेश मर्चंडे, मुश्ताक दाभिळकर, निलेश सापटे, प्रविण जाधव, सेजल गोवळे, वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, योगेश जाधव, अर्जुन भोसले, काशीराम सापटे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पाणी पुरवठा अधिकारी विकास साळवी, लेखाअधिकारी गोपीनाथ करडे यांनी आंदोलकांना प्रशासन करत असलेल्या कामाची माहिती दिली. तर उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष सुभाष सापटे, महिला बालकल्याण समिती सभापती समृध्दी शिगवण यांनी आंदोलकांना सभागृहात येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले. सुमारे दोन तास चाललेल्या गदारोळानंतर प्रशासनाने २४ जूनपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान, नगरपंचायतीचे पोट ठेकेदार झालेले विरोधक निकृष्ट कामांचे अपयश झाकण्यासाठी पाणी प्रश्नावर राजकारण करत आहेत. प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर बेछुट व बिनबुडाचे आरोप करत असल्याचा गंभीर आरोप उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे यांनी यावेळी केला.
शहरात पाणी साठे नसल्यानेच टँकरने पाणी पुरवठा झाला नाही, हे वस्तुस्थिती आहे. परंतु सध्या विरोधी नगरसेवक पोट ठेकेदार बनले आहेत. अनेक कामे चुकीच्या पध्दतीने व निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमच्याकडे केल्या आहेत. कामाच्या मूल्यांकनाच्या वेळी प्रशासनाने त्रुटी काढल्यास कामातून कमीशनचा मलिदा मिळणे शक्य नाही. त्यामुळे कामांचे अपयश लपविण्यासाठी विरोधक मूळ विषयापासून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. या विषयावर योग्यवेळी पुराव्यानिशी भाष्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT