अहमदनगर

नगर : पाथर्डीत उदमले, दिनकरांची सोय; राजगुरू कुटुंबातील महिला

अमृता चौगुले

पाथर्डी शहर : अमोल कांकरिया : नऊ जागेसाठी सर्वसाधारण महिला, तर सर्वसाधारण व्यक्ती नऊ जागेवर अरिक्षित असून, प्रत्येक प्रभागात एक महिलेची जागा आरक्षित राहणार आहे. प्रभाग दोन आता अनुसूचित जाती महिलेचे आरक्षणाने माजी नगरसेवक प्रवीण राजगुरू, आबासाहेब काळोखे, डॉ. जगदीश मुने या इच्छुकांना निवडणुकीसाठी कुटुंबातील महिलेला संधी द्यावी लागेल, तर इच्छुक उमेदवार माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, मंदाकिनी संजय दिनकर यांना हा प्रभाग सोईस्कर झाला.

नगरपरिषदेच्या पूर्वी 17 जागा होत्या, त्या वाढून 20 झाल्या आहे. या आरक्षण सोडतीमुळे फारसा काही फरक राजकीय आकडेमोडीत पडणार नाही. पाथर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीमध्ये 20 जागांपैकी दोन जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेे. आज (सोमवारी) नगरपरिषदेच्या सभागृहात प्रांतधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यधिकारी संतोष लांडगे यांनी आरक्षण सोडत केली. पाथर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौथीमधील विद्यार्थी शुभम गणेश काकडे व राधिका देविदास कोकाटे या मुलांच्या हस्ते सोडती कढण्यात आल्या.

या आरक्षणात अनुसूचित जातीसाठी दोन जागा आरक्षित राहिल्याने 18 जागेसाठी सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण व्यक्ती असे नऊ-नऊ जागा असणार आहेत. प्रभात एक 'अ' सर्वसाधारण महिला, 'ब' सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग दोन 'अ' अनुसूचित जाती महिला, 'ब' सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग तीन 'अ' सर्वसाधारण महिला, 'ब' सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग चार 'अ' सर्वसाधारण महिला, 'ब' सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग पाच 'अ' सर्वसाधारण महिला, 'ब' सर्वसाधारण व्यक्ती, प्रभगा सहा 'अ' सर्वसाधारण महिला, 'ब' सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग सात 'अ' सर्वसाधारण महिला, 'ब' सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग आठ 'अ' सर्वसाधारण महिला, 'ब' अनुसूचित जाती व्यक्ती, प्रभाग नऊ 'अ' सर्वसाधारण महिला, 'ब' सर्वसाधारण व्यक्ती, प्रभाग 10 'अ' सर्वसाधारण महिला, 'ब' सर्वसाधारण व्यक्ती, असे प्रभाग आरक्षित करण्यात आले.

काही आरक्षण असेही..!

सर्वसाधारण महिला म्हणजे कोणत्याही जातीमधील महिला या जागेवर निवडणूक लढवू शकते. याला जातीची अट नाही, तर सर्वसाधारण व्यक्ती म्हंटल्यावर या जागेवर कोणत्याही जातींमधील पुरूष अथवा महिलेला निवडणूक लढवता येईल. यालाही जातीची अट नाही; मात्र प्रभाग दोनमधील 'अ'गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी, तर प्रभाग आठमधील 'ब' गटाची जागा अनुसूचित जातीच्या व्यक्तीसाठी आरक्षित असणार आहे.

10 महिला नगरसेवक असणार

पाथर्डी नगरपरिषदेच्या दहा प्रभागात प्रत्येकी दोन उमेदवार असून, एकूण 20 उमेदवारांची संख्या आहे. शासन निर्णयानुसार महिलांना पन्नास टक्के आरक्षण असल्यामुळे 20 जागेसाठी 10 महिला जागा आरक्षित असणार आहे. प्रभात दोनमधील 'अ' गटात अनुसूचित जातीतील महिला, तर प्रभाग आठमधील 'ब' अनुसूचित जाती सर्वसाधारण व्यक्ती, असे आरक्षण असणार आहे. प्रभाग आठ हा अनुसूचित जातीच्या व्यक्तीसाठी आरक्षणाने नितीन एडके, दिलीप मिसाळ यांना निवडणुकीत चांगली संधी मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT