Sujay Vikhe Patil Sweden MP Remark pudhari
अहमदनगर

Sujay Vikhe Patil Sweden MP Remark: भारतात पडलो तरी आम्ही स्वीडनमध्ये खासदार झालो.. सुजय विखे पाटलांची टोलेबाजी

विखे पाटील घराण्यातील डॉ. अशोक विखे पाटील यांची सुकन्या आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील यांची नुकतीच स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे.

Anirudha Sankpal

Sujay Vikhe Patil Sweden MP Remark: आम्हाला खासदारकीपासून कोणी लांब ठेवू शकत नाही. भारतात पाडलं तरी आम्ही स्वीडनमध्ये खासदार झालो," असा जोरदार टोला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या राजकीय विरोधकांना लगावला आहे. कोल्हार येथील एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या या मिश्कील वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांची पुतणी खासदार

विखे पाटील घराण्यातील डॉ. अशोक विखे पाटील यांची सुकन्या आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पुतणी नीला विखे पाटील यांची नुकतीच स्वीडनच्या संसदेत खासदार म्हणून निवड झाली आहे.

खासदारकी विखेंच्या रक्तात

या पार्श्वभूमीवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाषणात खासदारकी विखेंच्या रक्तात हे आमचं रक्त आहे, पद्मश्री कै. विठ्ठलराव विखे पाटील आणि कै. बाळासाहेब विखे पाटील यांची पुण्याई आहे. महाराष्ट्रात आमच्या नावापुढून खासदार काढायचा प्रयत्न केला तरी आम्ही कुठून ना कुठून तरी खासदारकी मिळवून आणणारच ही भूमिका घेऊन काम करतो.

परदेशातही विखे घराण्याचा डंका

"खासदार साहेबांची (बाळासाहेब विखे पाटील) शिकवण असणाऱ्या नातवंडांनी काय करू दाखवलं, हे केवळ देशानेच नव्हे तर परदेशातील लोकांनीही पाहिलं आहे. त्यामुळे आम्हाला खासदारकी सोडायचीच नाही," असा विश्वास त्यांनी उपरोधिक शैलीत व्यक्त केला.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या या भाषणाने उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला असून, सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT