अहमदनगर

श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघ; अध्यक्षपदी बापूसाहेब गायकवाड

Laxman Dhenge

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुका खरेदी विक्री संघाच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडीत अध्यक्षपदी बापूसाहेब गायकवाड, तर उपाध्यक्षपदी बबन श्रीराम यांची बिनविरोध निवड झाली. माजी आमदार राहुल जगताप यांनी संघावर आपली पकड मजबूत केली आहे. या निवडणुकीत माजी अध्यक्ष अंकुश शिंदे यांच्या खेळीने राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांची स्ट्रॅटर्जी फेल ठरली. नुकत्याच झालेल्या श्रीगोंदा तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखालील श्री संत शेख महंमद महाराज पॅनलच्या गटाने 11 पैकी 11 जागा जिंकून आपले एकहाती वर्चस्व स्थापन केले.

विरोधी गटाचा 414 मतांनी दारुण पराभव केला होता. सोमवारी झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत राज्य बाजार समितीचे सभापती नाहाटा यांनी लक्ष घालत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, संघाचे माजी चेअरमन अंकुश शिंदे यांनी केलेल्या खेळीमुळे नाहटा यांची स्ट्रॅटर्जी फेल ठरली. निवड बिनविरोध होऊन माजी आमदार राहुल जगताप यांना संघावर आपली पकड मजबूत करण्यात यश आले. या निवडीवेळी 11 पैकी 10 संचालक उपस्थित होते. या निवडणुकीसाठी माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदचे माजी सदस्य सचिन जगताप यांनी मोलाची मदत केली.

मोडकळीला आलेल्या तालुका खादी ग्रामोद्योग संघाला आगामी काळात उर्जितावस्थेत आणून, संघ मजबूत करणार आहोत.

– राहुल जगताप, माजी आमदार.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT