राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 170 गण रचनेचा कार्यक्रम जाहीर केला असून जूनमध्ये ती अंतिम होणार आहे. त्यानंतर होणार्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे डोळे लागले आहेत. महिलांच्याही जागा वाढल्याने त्यांचे आरक्षण कोणत्या गटात पडणार, यावरही राजकीय समिकरणे ठरणार आहेत. दरम्यान, गत पंचवार्षिक निवडणुकीतून 36 महिला सभागृहात आल्या होत्या. यंदा महिलांचा टक्का वाढून तो 43 इतका झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गत पंचवार्षिक निवडणुकीत 73 गट आणि 146 गण होते. यंदा गटांची संख्या वाढून ती 85 झाली. 50 टक्के महिला आरक्षणाप्रमाणे 43 महिला सभागृहात दिसणार आहेत.
आगामी निवडणुकांसाठी पूर्वीच्या 73 ऐवजी 85 गट झाले आहेत. त्यामुळे महिलांसाठी 50 टक्के प्रमाणे साधारणतः 43 गट आरक्षित असणार आहेत. तर, पंचायत समितींच्या 170 गणापैकी 85 गण हे महिलांना द्यावे लागणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. 23 मे रोजी प्रारूप आराखडा आयुक्तांकडे पाठविला जाणार आहे. त्याला 31 मे रोजी मंजूरी मिळेल. 2 जून रोजी हा आराखडा प्रसिद्ध होणार आहे. 8 जूनपर्यंत हरकती घेतल्या जाणार आहेत. 22 ला सुनावणी आणि 27 जून रोजी अंतिम गट-गण रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
गतवेळचे महिला आरक्षित गट
अकोले – समशेरपूर (सर्वसाधारण महिला), राजूर (सर्वसाधारण महिला) संगमनेर – आश्वी बु. (सर्वसाधारण महिला), जोर्वे (अनु.जमाती महिला), साकूर (सर्वसाधारण महिला). कोपरगाव – ब्राह्मणगाव (सर्वसाधारण महिला), वारी (अनु. जाती महिला),चांदेकसारे (ना.मा.प्र. महिला) राहाता – वाकडी (ना.मा.प्र. महिला), साकोरी (सर्वसाधारण महिला), लोणी खु. (ना.मा.प्र. महिला) श्रीरामपूर – उंदिरगाव (अनुसूचित जमाती महिला), टाकळीभान (अनुसूचित जमाती महिला), दत्तनगर (सर्वसाधारण महिला) नेवासा – कुकाणा (ना.मा.प्र. महिला), भानस हिवरे (अनु. जाती महिला), सोनई (अनु. जाती महिला), चांदा (ना.मा.प्र. महिला) शेवगाव – दहिगाव-ने (सर्वसाधारण महिला), बोधेगाव (अनु. जाती महिला),. पाथर्डी – टाकळी मानूर (ना.मा.प्र. महिला), माळी बाभूळगाव, नगर – जेऊर (ना.मा.प्र. महिला),वाळकी (सर्वसाधारण महिला) राहुरी – टाकळीमियाँ (अनु. जमाती महिला), वांबोरी (सर्वसाधारण महिला), सात्रळ ( महिला) श्रीगोंदा – येळपणे (ना.मा.प्र.महिला), कोळगाव,आढळगाव, बेलवंडी.मांडवगण. पारनेर – ढवळपूरी, कान्हूर पठार, सुपा कर्जत – कारेगाव (ना.मा.प्र.महिला), जामखेड – खर्डा (अनु.जाती महिला).
जाती, जमाती 7, सर्वसाधारण 36 महिला !
अनुसूचित जातीच्या जागा वाढून त्या 10 झाल्यास 50 टक्के प्रमाणे 5 जागा महिलांना द्यावा लागणार आहेत, तर जमातीच्याही जागेत भर पडून त्यांच्या संभाव्य 8 मधून 4 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे 36 जागा सर्वसाधारण महिलांसाठी असतील, असे संभाव्य चित्र असेल.
2017 आरक्षण
2022 आरक्षण
जिल्हा परिषद निवडणुकीच्या गट-गण रचनेनंतर आरक्षणाची प्रक्रिया सुरू होईल. महिलांना 50 टक्के प्रमाणे जागा द्यावा लागणार आहेत. त्यानुसार 85 पैकी 43 जागांचे ते आरक्षण असू शकेल. यात जाती, जमातीतूनही महिलांना 50 टक्के जागा जातील.
– उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.